वकील प्रवीण चव्हाणांची तेजस मोरेंविरोधात तक्रार

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला होता. या पेनड्राईव्ह बॉम्बचा विषय संपूर्ण राज्यभर चर्चेचा ठरला आहे. यात अनेक बड्या लोकांची नावे उघड होत आहेत. माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजनांविरोधात विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांनी कटकारस्थान रचून त्यांच्यावर मोक्का लावण्यासाठी कसे प्रयत्न होत आहेत, हे त्या पेनड्राईव्ह बॉम्बमध्ये फडणवीसांनी उघड केले. त्यानंतर विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांनी तेजस मोरे नावाच्या व्यक्तीने छुप्या कॅमेऱ्याने आपले व्हिडीओ केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी आता पुण्यातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यामध्ये काल रात्री प्रवीण चव्हाण यांनी तेजस मोरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

.. म्हणून चव्हाणांनी नोंदवली तक्रार

दरम्यान प्रवीण चव्हाण यांनी तेजस मोरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून गोपनीयता भंग, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा यांचा भंग केल्याच्या आशयाची तक्रार त्यांनी नोंदवली आहे. प्रवीण चव्हाण यांच्या ऑफिसमध्ये केलेलं स्टिंग ऑपरेशन हे तेजस मोरे यांनी केल्याचा चव्हाण यांनी आरोप केला आहे.

हे देखील वाचा-

पेनड्राईव्ह बॉम्बचे जळगाव कनेक्शन ?

तेजस मोरेचा मला फसवण्याचा उद्देश

याआधी तेजस मोरे यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडत म्हणाले की, आपण कोणालाही भेटलो नाही तसेच माझे कुठलेही राजकीय संबंध नाही. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सादर केलेले स्टिंग ऑपरेशनचे हे तेजस मोरेने सुपारी घेऊन केल्याचा आरोप चव्हाण यांनी केला होता. तसेच तेजस मोरेच्या बाबतचे सगळे पुरावे आपल्याकडे असून त्याने मला अनेक वेळा एसी, स्मार्ट टीव्ही भेट देण्याचा आग्रह धरला होता. त्यामुळे तेजस मोरेला आपण येऊ नको असे वारंवार सांगत होतो. मात्र मला फसवण्याचा त्याचा उद्देश असल्याने तो वारंवार माझ्याकडे येत होता. इतकेच नाहीतर माझ्या ऑफिसमधून मोबाईल, लॅपटॉप बॅग चोरीला गेल्याचे सांगत मोरे आठवड्यातून दोन ते तीन वेळा कार्यालयात येत असल्याचे प्रवीण चव्हाण म्हणाले.

आता याप्रकरणी नेमकं काय होणार ? याकडे सर्वांचे लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.