ठाण्यात ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळी ठेवल्याचा ईमेल, सर्वत्र एकच खळबळ

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

ठाण्याच्या सिनेगॉग चौकात बॉम्ब ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळी बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती ईमेलवर देण्यात आली आहे. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे. बॉम्बशोधक पथक त्याठिकाणी दाखल झाले असून, बॉम्ब शोधण्याचं काम सुरु आहे.

अज्ञात मेलद्वारे प्रार्थनास्थळात बॉम्ब ठेवल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे पोलीस यंत्रणा सर्तक झाली असून आयुक्त, डीएसपी, एसपी घटनास्थळी आले आहे. बॉम्बशोधक पथक प्रार्थनास्थळात गेले असून बॉम्बचा शोध घेतला जात आहेत. सदर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

एक दिवसापूर्वी दिल्लीतील इस्राइली दूतावासाबाहेर स्फोट झाल्याची घटना घडली. शिवाय दूतावासाबाहेर एक पत्र सापडले होते. त्यात धमकी देण्यात आली होती. तसेच आरबीआएच्या ठिकाणांवर बॉम्ब ठेवल्याचा ईमेल देखील आरबीआयला मिळाला होता. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.