लोकशाही न्यूज नेटवर्क
पतीने चहा मागितला म्हणून पत्नीने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने कैचीने पतीने हल्ला केला. तिने थेट पतीच्या डोळ्यातच कैची घातकी. उत्तर प्रदेशाच्या बागपत जिल्ह्यात ही घटना घडली आहे. यानंतर आरोपी पत्नीने पोलीस कारवाईपासून वाचण्यासाठी घटनास्थळावरून पळ काढला. तर दुसरीकडे पती रक्तबंबाळ अवस्थेत घरात पडला होता.
अंकित पीडित तरुणाचं नाव आहे. ती वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं होत. पण लग्नानंतर काही दिवसातच दोघांमध्ये घरगुती कारणावरून भांडण झाल. एवढेच नाही तर अंकितच्या पत्नीने पोलिसात तक्रारही दाखल केली होती. विशेष म्हणजे या घटनेच्या तीन दिवस आधीच ही तक्रार दाखल करण्यात आली होती. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तक्रारीत तिने पती आणि सासरच्यांकडून छळ होत असल्याचा आरोप केला होता.
जेव्हा ही घटना घडली तेव्हा अंकिताने एक कप चहाची मागणी केली होती. पण त्याने चहा मागितल्यामुळे आरोपी पत्नी संतापली. तिने घरातील कैची उचलून त्याच्या ड़ोळ्यांत घातली. यादरम्यान झालेल्या गोंधळामुळे अंकितची वहिनी आणि लहान मुलं धावत बाहेर आली. यानंतर त्यांनी पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली.
पोलीस घटनास्थळी दाखल होण्याआधी अंकितच्या पत्नीने पळ काढला होता. तर दुसरीकडे अंकित रक्ताच्या थारोळ्यात घरात पडला होता. पोलीस अंकिताला उपचारासाठी कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये घेऊन गेले होते. यानंतर त्याला नेराठाला नेण्यात आलं. दरम्यान आरोपी पत्नीला अटक करण्यासाठी पोलिसांनी शोध सुरु केला आहे. पोलीस सध्या सर्व बाजूंनी तपास करत आहेत.