काय सांगता… पूनम पांडे आहे जिवंत, व्हिडिओ व्हायरल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

काल सर्वत्र खळबळ उडवणारी बातमी म्हणजे पूनम पांडेच वयाच्या 32 व्या वर्षी निधन झाल्याची होती. कालपासून पुनमचं निधन झाल्याच्या बातम्या जोर धरत होत्या. सर्व्हिकल कॅन्सरनं तिचं निधन झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली. त्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला पण, ही बातमी ऐकून अनेकांनी बरेच प्रश्न उपस्थित केले होते.

या सगळ्यात आता पुन्हा पांडेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यात तीने मी जिवंत असल्याचे सांगितले आहे. तो व्हिडिओ समोर आल्यानंतर मात्र चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. भरपूर जणांनी तिच्यावर कडाडून टीका केली आहे.

 

दरम्यान सोशल मीडियावर पूनमच्या निधनाबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात आल्या होत्या. यात आता पूनमने आपण गर्भाशयाच्या कॅन्सर बाबत जनजागृती करत असून, यामुळे असं कृत्य केल्याचे म्हटले आहे. या सगळ्यात तिच्या बॉडीगार्ड ची प्रतिक्रियाही समोर आली होती. पूनमच्या कुटुंबीयांनी त्यांचे फोन बंद करून ठेवले होते. त्यांच्याकडून कोणत्याही प्रतिक्रिया समोर आली नव्हती. त्यामुळे वेगवेगळ्या अफवांना उधान आले होते. पूनम पांडेच्या निधनानंतर आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी पुनमचं मृत्यू झाल्यानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता मात्र, आता तिच्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.