बसमध्ये चढत असताना महिलेचे मंगळसूत्र लांबविले

0

पाचोरा ;- येथील बस स्टँड परिसरात असणाऱ्या एसटी बसमध्ये महिला प्रवासी चढत असताना वीस हजार रुपये किमतीचे मनी मंगळसूत्र अज्ञात लांबविण्याचा प्रकार दोन रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला असून याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्राने दिलेली माहिती अशी की वैष्णवी ज्ञानेश्वर जाधव वय 23 रा. मालेगाव या नातेवाईकांकडे आले असता पाचोरा बस स्टॅन्ड परिसरात एका एसटी बस मध्ये चढत असताना त्यांचे वीस हजार रुपये किमतीचे मनी मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लांबवीले या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मुकुंद परदेशी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.