गोंडगाव येथे मेडिकल आणि सराफा दुकान फोडले

0

भडगाव ;- तालुक्यातील गोंडगाव येथे मेडिकल आणि सराफा दुकान अज्ञात चोरट्याने फोडून दुकानांमधील हजारो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना दोन रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली . या प्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की गौरव सुनील साळुंखे आणि राहुल नामदेव सोनार यांच्या मालकीचे मेडिकल आणि सराफा ज्वेलर्सचे दुकान असून चोरट्यांनी एक जानेवारी रोजीच्या रात्री दहा ते दोन जानेवारीच्या सकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान फोडून त्यांनी मेडिकल दुकानातल्या काउंटरवर ठेवलेल्या ड्राव्हर मधून दहा हजार रुपये तसेच राहुल सोनार यांच्या दुकानातील चांदीचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आल्याने याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक फौजदार छबुलाल नागरे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.