सुरू होणार पोलिसांचा गोळीबार सराव

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

जळगाव; शहरात पोलिसांचा गोळीबार सराव १४ फेब्रुवारी ते १२ मार्चच्या दरम्यान होणार असल्याने या परिसरात नागरिकांनी अकारण फिरू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज एका परिपत्रकाच्या माध्यमातून पोलिसांच्या गोळीबार सरावाबाबतची माहिती दिली आहे. यानुसार सावखेडा शिवारातील कोल्हे हिल्स परिसरात असणार्‍या फायरींग बट या परिसरात दिनांक १४ फेब्रुवारी ते १२ मार्च २०२० या कालावधी दररोज सकाळी सहा वाजेपासून पोलीस दल गोळीबाराचा वार्षीक सराव करणार आहे.

या दरम्यान, जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार आणि कर्मचारी गोळीबाराचा सराव करणार आहेत. यामुळे सावखेडा शिवारातील कोल्हे हिल्स परिसरातील नागरिकांनी या परिसरात अकारण फिरू नये, तसेच गर्दी करू नये असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी या परिपत्रकात केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.