प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी देण्याच्या मागणीचे पोलीस भरतीच्या उमेदवारांचे आ. चंद्रकांत पाटीलांना निवेदन…

0

 

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

निवडणुका जवळ आल्या असताना नवीन भरती काढण्यापेक्षा भरतीत जागा वाढून प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी देण्यात यावी. अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. असे केल्यास भरतीसाठी अहो-रात्र मेहेनत घेतलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना न्याय मिळेल. प्रतीक्षा यादीतील मुलांची कागदपत्रे तपासणी व पोलीस व्हेरिफिकेशनही झाले आहे. त्यामुळे आपण आमचे म्हणणे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या पर्यंत पोहोचवावे व त्यांच्याकडे आग्रह धरावा असे निवेदन मुंबई पोलीस भरती मध्ये प्रतीक्षा यादीत समाविष्ट असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील उमेदवारांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिले आहे.

मुंबई पोलीस भरतीमध्ये तालुक्यातून मुलं उतरत असतात, नुकत्याच भरती प्रक्रिया सुरू असून यामध्ये पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी तसेच रिक्त जागांचा विचार करता भरतीत जागा वाढवून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना स्थान मिळावे यासाठी मुलांनी न्याय हक्कासाठी लढा सुरू ठेवला आहे. त्यासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील प्रतिक्षा यादीतील उमेदवारांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना याबाबतचे निवेदन दिले असून जागा वाढविण्याबाबत तसेच प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी देण्याबाबत राज्य सरकारकडे आग्रह धरावा अशी विनंती केली. यावेळी निवेदन देतांना स्वप्निल चोपडे, महादेव वराडे, मंगेश पाटील, वैभव तायडे, पंकज पाटील, विशाल वरकडे, प्रणव मोरे, योगेश खांजोळे, राहुल तायडे, राहुल दंडारे, गणेश चव्हाण आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.