महत्वाची बातमी ! LPG सिलिंडरवर ‘इतक्या’ लाखांचं कव्हर मिळणार

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

LPG सिलिंडर ग्राहकांसाठी महत्वाची माहिती आहे. आता LPG सिलिंडरवर ‘इतक्या’ लाखांचं कव्हर मिळणार आहे. एलपीजी सिलिंडरचा वापर करताना अनेक दुर्घटना होत असतात, असे झाल्यास होणाऱ्या नुकसानीची भरपाई दिली जाते. ही भरपाई तेल विपणन कंपन्या देतात. याबाबत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत सविस्तर माहिती दिली आहे.

असे असेल कव्हर 

मिळालेल्या माहितीनुसार,  तेल विपणन कंपन्यांसोबत रजिस्टर्ड असलेल्या सर्वच एलपीजी उपभोक्त्यांना विमा कव्हर मिळाले आहे. एलपीजी सिलिंडरच्या आगीमुळे मृत्यू झाल्यास प्रति व्यक्ती 6 लाख रुपयांचे वैयक्तिक अपघात कव्हर आहे. प्रति व्यक्ति कमाल 2 लाख रुपयांसह प्रति घटनेसाठी 30 लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय खर्च कव्हर केला जातो. याच प्रकारे प्रॉपर्टीचे नुकसान झाल्यास प्रति घटना कमाल 2 लाख रुपयांपर्यंतचे कव्हर मिळते.

काय करावे लागणार ?

दरम्यान ग्राहकाच्या परिसरात कुठल्याही प्रकारची दुर्घटना झाल्यास, त्या ग्राहकाला संबंधित तेल विपणन कंपनीच्या वितरकाला कळवावे लागते. यानंतर, वितरकाकडून तेल विपणन कंपनीच्या कार्यालयाला माहिती दिली जाईल. यावर, तेल विपणन कंपनीचे कार्यालय विमा कंपनीला माहिती देते. यानंतर संबंधित विमा कंपनी विमा पॉलिसींच्या तरतुदींनुसार दाव्याच्या निपटाऱ्यासाठी निर्णय घेते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.