१२ वी (सी.बी.एस.ई.) परीक्षेत पोदार इंटरनॅशनल स्कुलची १००% टक्के निकालाची परंपरा कायम !

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सी.बी.एस.ई.) घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी च्या परीक्षेचा निकाल दिनांक १२ मे २०२३ रोजी जाहीर झाला. या परीक्षेत जळगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले आहे. या वर्षीही शाळेची १००% निकालाची परंपरा कायम ठेवीत विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांचा निकाल पुढील प्रमाणे:

नचिकेत राहुल पाटील ९५.८० % गुण मिळवून इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतून शाळेतून प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर आदित्य सुमित मुथा याने ७९.६० % गुण मिळवून वाणिज्य शाखेतून शाळेतून प्रथम  क्रमांक पटकावला.

पोदार इंटरनॅशनल स्कूल चे चेअरमन डॉ. पवन पोदार, विश्वस्त गौरव पोदार व हर्ष पोदार तसेच प्राचार्य गोकुळ महाजन यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी शाळेचे उपप्राचार्य दिपक भावसार यांनी पालकांचे तसेच शिक्षकवृन्दांचे अभिनंदन केले. जितेंद्र पाटील, कामिनी महाजन, छाया बोरसे यांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. पोदार प्रेप च्या मुख्याध्यापिका उमा वाघ, प्रशासकीय अधिकारी जितेंद्र कापडे व शिक्षकवृन्द यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.