तोंडापुर येथील महिलेवरील हल्ला डुकराचा की माणसांचा ?

0

 

वाकोद (विशाल जोशी), लोकशाही न्युज नेटवर्क:

वाकोद ता. जामनेर येथून जवळ असलेल्या बाजार पेठेचे असलेले तोंडापुर गावात गेल्या दोन तारखेला एका आदिवासी महिलेलवर प्राणघातक हल्ला झाला, हा हल्ला जंगली प्राण्यांचा की माणसांचा ? हे अद्याप समजु शकले नाही.

सविस्तर वृत्त असे की दोन तारखेला पिडित महिला व तीची वहिनी हे दोघं शौचलयासाठी बाहेर गेले होते. पिडित महिला हि शौच्चास मोकळ्या जागेत व तीची वहिनी हि बांधलेल्या शौचलयात गेली, काही वेळा नंतर पिडित महिलेची वहिनी शौचलयातून बाहेर आली असता, पिडित महिला त्या ठिकाणी दिसली नाही. पाऊस चालु असल्याने पिडित महिला घरी निघून गेली असेल म्हणून तिची वाहिनी देखील घरी निघून आली. परंतु पिडित महिला घरी आली नसल्याने तिने सासु, पती व इतरांन समवेत घेत शौचाच्या ठिकाणी शोधा शोध करत असतांना पिडित महिला गंभीर जखमी अवस्थेत शौचलयाच्या बाजूला असलेल्या गवतात आढळून आली.

सर्व प्रथम पिडितेला गावातील डॉक्टरांकडे नेण्यात आले, पंरतू त्यांनी पुढे उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला. तोंडापुर येथून जामनेर व जामनेर येथून जिल्हा सामान्य रूग्णालय व तेथून सुध्दा जखमी पिडितेला डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात पाठवण्यात आले.

तेथे उपचार केल्या नंतर या पिडितेला संभाजीनगर येथील घाटी रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आणि आज रोजी सुद्धा पिडित महिलेवर घाटी येथे उपचार सुरू असून पिडितेच्या प्रकृती मध्ये सुधारणा होतांना दिसत असली तरी पिडितेला अजून बोलता येत नाही.

पिडित महिलेच्या नातेवाईकेच्या फिर्यादी वरून पहुर पोलीस स्टेशन येथे भा.द.वी कलम 326/324 गु.र.न प्रमाणे दाखल आहे. सदर फिर्यादी महिलेच्या सांगण्या वरून पिडित महिलेला डुकरांच्या हल्ल्यात पिडित महिला जखमी झाल्याचं सागण्यात आलं. पंरतु पिडित महिलेवर डुकरांने हल्ला केला असं पिडित महिलेने सागितंल असल्याचं फिर्यादीत म्हटंल आहे. शौचलयात असलेल्या महिलेला हल्ला झाला तेव्हा पिडित महिलेचा कुठलाच आवाज आला नसेल का? सायंकाळची वेळ होती तेव्हा इतर कोणत्याच महिला शौच्चासाठी नसतील का?  डुकरांचा हल्ला हा पिडितेच्या चेर्हावर ऐवढ्या इजा करू शकतात काय? असे अनेक प्रश्न तोंडापुर परिसरातील नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनले आहे.

वैद्यकिय अधिकारी यांच्या मते हा हल्ला जंगली प्राण्यांचा असु शकतो. असा प्राथमिक अंदाज असला तरी रिपोर्ट आल्या शिवाय ठाम सांगु शकत नसल्याचं म्हटंल आहे.

पोलीसांचा हॉस्पीटलशी पत्र व्यहवार

पहुर पोलीस स्टेशनने पिडितेच्या ज़बाब घेण्यासाठी सदर हॉस्पीटला तीन वेळा पत्र व्यहवार करून दोन वेळेला पिडितेच्या भेटीला जावून आल्याचे कळते आहे. या प्ररकरणी परिसरात मात्र उलट सुलट चर्चा सुरू आहेत.

सदर महिलेच्या नातेवाईकांच्या फिर्यादी वरून गुन्हां दाखल केला असून, पोलीस आपला तपास करत आहेत. वैद्यकिय अधिकारी यांच्या कडून रिपोर्ट व पिडितेचा प्रत्यक्ष ज़बाब घेतल्यानंतरच स्पष्ट बोलता येईल. असे पहूर पोलीस स्टेशनचे उप निरीक्षक अमोल गर्जे यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.