इस्रायलच्या पंतप्रधान नेत्यान्याहू यांचा नरेंद्र मोदींना फोन ; काय झाली चर्चा?

0

नवी दिल्ली ;- इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सरू असून आज युद्धाचा चौथा दिवस आहे. या युद्धात दोन्ही बाजूचे सुमारे १६०० लोक मृत्यूमुखी पडले आहेत. तर ७,००० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. दरम्यान, मध्य पूर्वेतील अनेक मुस्लीम राष्ट्रांनी पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शवला आहे. तर अमेरिका आणि युरोपातील काही देश इस्रायलसोबत उभे आहेत. भारतानेही इस्रायलच्या बाजूने भूमिका घेतली असून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केल्याचे वृत्त समोर आले आहे.

इस्रायला अमेरिकेसह, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि ब्रिटनने आज सकळी संयुक्त निवेदन जारी करत पाठिंबा दर्शवला आहे. हमासच्या दहशतवादी कृत्यांचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही संयुक्तपणे हमास आणि त्यांच्या दहशतवादी कृत्यांचा निषेध करतो, असं या राष्ट्रांनी निवेदनात म्हटलं आहे.

अमेरिका, फ्रान्स, इटली, जर्मनी आणि ब्रिटनने संयुक्त निवेदनात म्हटलं की, आज फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कॉल्झ, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आम्ही सर्वजण एकजुटीने इस्रायलला पाठिंबा देतो. आम्ही हमास आणि त्यांच्या दहशतवादी कृत्यांचा निषेध करतो.” या युद्धजन्य परिस्थितीत भारतही इस्रायलच्या बाजूने उभा असून भारतानेही हमासचा निषेध नोंदवला आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे की, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी मला फोन करून तिथल्या परिस्थितीची माहिती दिली, याबाबत मी त्यांचे आभार मानतो. या बिकट परिस्थितीत आम्ही भारतीय लोक इस्रायलच्या बाजूने खंबीरपणे उभे आहोत. भारत अशा दहशतवादी कृत्यांचा तीव्र आणि निःसंदिग्धपणे निषेध करतो.असे म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.