डॉ. प्रभू व्यास यांना पी.एच.डी प्रदान…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

राम टोटल बॉडी चेक अपचे संचालक डॉ प्रभू व्यास यांना PhD. प्रदान करण्यात आली आहे. डॉ. प्रभू व्यास यांनी बेंगलोर येथून युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन चे एम.एस व पोस्ट ग्रेज्युएट  डिप्लोमा पास केला. त्यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून पोस्ट ग्रेज्यूएट डिप्लोमा इन सायकॉलॉजीकल गाईडंस व  कौन्सिलिंग केले. डॉ. प्रभू व्यास यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये सहभाग घेतला व रीसर्च पेपर प्रेझेन्ट केले, पती पत्नीचे दाम्पत्य जीवन, वैवाहिक जीवन व संततीप्राप्तीसाठी फार उपयोगी आहे . त्यांनी त्या आधी क्लिनिकल पथॉलॉजी, हाफकिन इन्स्टिट्युट परळ मुंबई हून केला. मुंबई येथील अनेक हॉस्पीटल जसे कि, भायखळा येथील मसीना हॉस्पीटल, सी पी टेंक चे कोठारी हॉस्पीटल , व्ही. टी. सी. एस .टी. कामा अँड अँब्लेस हॉस्पीटल, ताडदेव येथील  दी. भाटीया  जनरल हॉस्पीटल याठिकाणी अनेक वर्ष सेवा केली.

ते जळगाव ज्युनिअर चेंबर चे माजी अध्यक्ष आहेत व रोटरी मेडिकल कमीटी चे माजी चेअरमन आहेत. त्यांनी विविध मधुमेह तपासणी शिबिर, हिमोग्लोबीन तपासणी शिबिरकोलेस्टेरॉल , लिपिड प्रोफाईल हृदयरोग तपासणी, नेत्र तपासणी शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर इत्यादि आयोजीत केले आहे. त्यांनी स्वतः 122  वेळा  रक्तदान केले आहे. त्यांना भारतीय ज्युनिअर चेंबर चे माजी राष्ट्रिय अध्यक्ष  के. वल्लभदास द्वारे कमलपत्र अवार्डने सन्मानीत करण्यात आले होते. या यशाबद्दल, नानावटी सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलचे डॉ राज ब्रम्हभट, नागपूर येथील डॉ संजय देशपांडे, हैदराबाद येथील डॉ रामन्ना यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांना सुप्रसिध्द हेड रीडर, गाईड डॉ. रमेश पोतदार यांचे मार्गदर्शन मिळाले.

Leave A Reply

Your email address will not be published.