माहेजीत वडील चालवतात रिक्षा; मुलाने मिळवली फार्मास्युटिकल या विषयात पीएचडी…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

माहेजी ता. पाचोरा येथील रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे अशोक पवार (भावडू पवार) यांचा लहान मुलगा मनोज अशोक पवार याने माटुंगा (मंबई) येथे झालेल्या १३ व्या दिक्षात समारंभात रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या माध्यमातून फार्मास्युटिकल या विषयात पी.एच.डी. पदवी प्राप्त केली आहे. त्याला पदवी कुलगुरू प्रा. अनिरुद्ध पंडित यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

या पदवीसाठी प्रा. प्रदीप वावीया यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मनोज पवार हा लहानपनापासून अत्यंत हुशार असल्यामुळे आई वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले शिक्षण पूर्ण करत राहिला, वडीलही आपल्या जेमतेम उत्पनातुन मुलगा हुशार असल्यामुळे पैश्यासाठी कधीच कमी पडले नाही. माहेजी गावातुन पहिला पीएचडी पदवी घेणारा विद्यार्थी मनोज पवार ठरला आहे. वडीलांचे शिक्षण जेमतेम तिसरी, बेताची परिस्थिती थोडीशी शेती व रिक्षा चालवून यातुनच दोन मुलांचे शिक्षण केले. त्यात एक सोयगाव येथे एस. टी. महामंडळाची नोकरी मिळाली तर लहान हा फार्मसी मधून मास्टर डिग्री शिक्षण घेऊन इन्स्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी माटुंगा (मुंबई) विद्यापीठातुन फार्मास्युटिकल या विषयात पी.एच.डी. पदवी मिळवल्यानंतर गावात एकच आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या यशाबद्दल डॉ. मनोज पवार यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.