शेडाशी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपची मुसंडी

0

पेण, लोकशाही न्यूज नेटवर्क

पेण तालुक्यातील शेडाशी ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण एक जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपनी मुसंडी मारली असून सतीश रामचंद्र कदम याला २२८ मते मिळून विजयी झाला आहे.

शेडाशी ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण जागेसाठी प्रभाग तीन मधील पोटनिवडणुकीसाठी त्या प्रभागात भाजप, शिवसेना आणि अपक्ष असे तीन उमेदवार रिंगणात उभे होते. यामध्ये भाजपचे सतीश रामचंद्र कदम याला विरोधक उमेदवारांपेक्षा १२ मते जास्त मिळाल्याने सतीश कदम याला विजयी झाल्याचे निवडणूक अधिकारी यांनी घोषित केले.

यावेळी बोलतांना सरपंच प्रकाश कदम म्हणाले की, आमदार रविशेठ पाटील यांच्या माध्यमातून गावात अनेक विकासात्मक कामे केली असून जनतेने आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविणार असून याहीपेक्षा अधिक विकास कामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर यावेळी निवडून आलेल्या उमेदवाराचे आमदार रविशेठ पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.