जमिनीच्या मोबदल्यासाठी वृद्धाचे पत्नी व मुलासह आमरण उपोषण

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

पाचोरा तालुक्यातील तारखेडा बु” येथील रहिवाशी सुभाष रामलाल पाटील यांचे तारखेडा शिवारातील गट क्रं. ३३७ / १ ही शेतजमीन लघुपाटबंधारे विभाग, जळगांव यांनी धरणाचे कामासाठी दि. १ जुन १९९१ पासुन संपादित करुन जमिनीवर ताबा घेतला आहे. त्यानंतर संबंधित वृद्ध शेतकऱ्याचा आपल्याच जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी लढाई सुरू झाली असुन आज तागायत वृद्धाची पत्नी व मुलासह त्यांच्या हक्काच्या पैशांसाठी भटकंती सुरु असुन लघु पाटबंधारे विभागाने सुभाष पाटील यांना गेल्या २५ वर्षात तुटपुंजी रक्कम देवुन त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे.

सूभाष पाटील यांनी आपल्या हक्काच्या जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करुन सुध्दा त्यांना न्याय मिळत नसल्याने सुभाष रामलाल पाटील, अलका सुभाष पाटील (पत्नी), चेतन सुभाष पाटील (मुलगा) हे पाचोरा येथील मोंढाळा रस्त्यावरील लघु पाटबंधारे बांधकाम उपविभाग या कार्यालया समोर मृत्यू पुर्व आमरण उपोषणाला बसले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.