“84 वय झाले तरी थांबायला तयार..”, अजित पवारांचा शरद पवारांना टोला

0

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड टोलेबाजी सुरूय. त्यातच अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडली तेव्हापासून राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यापासून अजित पवार आणि शरद पवार यांच्यात प्रचंड टोलेबाजी सुरु असते. त्यातच आता अजित पवारांनी शरद पवारांच्या वयावर पुन्हा एकदा टीका केला आहे.

स्वार्थासाठी सत्तेत नाही

ठाण्यात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार बोलत होते. स्वतःच्या स्वार्थासाठी सत्तेत आलेलो नाही, तर समाजाच्या हितासाठी, बहुजनांच्या कल्याणासाठी सत्तेत सहभागी झालो आहे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही तिघे एकत्र आलो आहे, असे सांगत अजित पवारांनी पुन्हा एकदा सत्तेत सहभागी होण्याचे कारण स्पष्ट केले. शरद पवारांचे नाव न घेता, राज्य सरकारमध्ये निवृत्तीचे वय 58 आहे. पण काही लोक 80-84 वय झालं तरी थांबायला तयार नाही, असे म्हणत अजित पवारांनी शरद पवारांच्या सक्रीय राजकारणावर टीका केली आहे.

चार-चार वेळा उपमुख्यमंत्री

तसेच ते म्हणाले, “वय झाल्यानंतर थांबायचं असतं. ही वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आहे. माणूस साठीला आला की निवृत्त होतो. राज्य सरकारमध्ये 58 मध्ये रिटायर्ड होता. त्यांची मागणी आहे की 60 पर्यंत निवृत्त करण्याची मागणी आहे. मात्र काही 80, 84 वय झालं तरी रिटायर्ड व्हायला तयार नाही. काही चुकलं तर सांगा ना आम्हाला. आम्ही चार-चार वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. काही चुकत असले तर त्यांनी सांगितलं पाहिजे. पण ते वय झालं तरी थांबायला तयार नाही.” असं म्हणत शरद पवारांवर टीका केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.