रस्त्याच्या कामात विलंब केल्याप्रकरणी आयुक्तांनी बजावली नोटीस

0

जळगाव : रस्त्याच्या कामांत विलंब केल्याप्रकरणी महापालिकेच्या आयुक्तांनी अभियंत्यास नोटीस बजावली असून तीन दिवसात खुलासा सादर न केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील नोटीसद्वारे देण्यात आला आहे.

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील जिल्हा नियोजन समिती अंतर्गत प्रशासकीय मान्यता असलेल्या प्रकल्पांच्या निविदा प्रक्रिया जळगाव शहर महानगरपालिकेमार्फत सुरु आहेत. त्यातील प्रशासकीय मान्यता असलेल्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियान योजनेअंतर्गंत रस्ते काँक्रीट व डांबरीकरण करण्यासाठी निविदा मागविण्यात आली होती. या निविदा धारकांकडून आवश्यक दस्तऐवज निविदेसोबत जोडलेली असतांना सुध्दा त्यांना कनिष्ठ अभियंता समिर बोरोले यांनी दस्तऐवजाची पुर्तता करण्याबाबत कळविले होते.

तद्नंतर सुध्दा बोरोले यांनी नस्ती आपल्याकडे सुमारे एक महिना प्रलंबित ठेवून प्रशासनाची दिशाभूल केलेली आहे. त्यामुळे सदर कामाला विलंब झालेला असून विकास कामात अडथळा निर्माण झालेला आहे. त्यामुळे मनपाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते सदरची बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून बेजबाबदाराची आहे. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. म्हणून शिस्त भंगाची कारवाई प्रस्तावित का करण्यात येवू नये अशी नोटीस कनिष्ठ अभियंता समिर बोरोले यांना आयुक्तांनी बजावली असून तीन दिवसात लेखी खुलासा विभाग प्रमुखांकडे अभिप्रायासह सादर न केल्यास शिस्त भंगाची कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.