शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या भेटीने राजकारण पुन्हा तापले…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या हालचाली बघायला मिळत आहेत. त्यातच सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. अदानी यांनी शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओकवर येऊन शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान त्यांच्यामध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

अदानीप्रकरणात जेपीसी स्थापन करावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली होती. मात्र शरद पवार यांनी अदानींची पाठराखण केली. अदानी प्रकरणात जेपीसीची आवश्यकता नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं. अदानी यांना जाणून बजून टार्गेट करण्यात आलं असावं असं आम्हाला वाटत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं. शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेस अडचणीत आले. त्यानंतर आज अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. ही चर्चा नेमकी कशावर झाली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाहीये. मात्र या भेटीची चर्चा सुरू झाली आहे. दोन दिवसांपूर्वी अजित पवारांच्या नाराजीनाट्याच्या सुरानंतर ही राज्यातील सर्वात मोठी घडामोड असल्याचे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.