जळगावातील महिलेची सव्वा लाखात फसवणूक ; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
महिलेची १ लाख २४ हजार ७५४ रुपयांत ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना शहरातील जुनी एमआयडीसी परिसरातील एम.एस.ई.बी. कॉलनीतील समोर आली असून याप्रकरणी बुधवार, १९ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, एम.एस.ई.बी. कॉलनीतील स्वाती विठ्ठल तायडे वय ३३ यांनी ऑनलाईन साडी ऑर्डर केली होती. या साडीची डिलेव्हरी ट्रॅक करण्यासाठी ७ एप्रिल रोजी स्वाती तायडे यांनी बी २ स्मार्ट एक्सप्रेस कुरियर सर्व्हीसकंपनीच्या वेबसाईटवर असलेल्या क्रमाकांवर फोन केला असता संबंधिताने विश्वास संपादन करत स्वाती तायडे यांच्या बँक खात्यातील १ लाख २४ हजार ७५४ रुपये ऑनलाईन परस्पर वळवून घेतले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर स्वाती तायडे यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरुन बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक दत्तात्रय गिरधर बडगुजर हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.