मंगरूळ येथे चोरट्यांनी फोडले दुकान; रोख रकमेसह ऐवज लंपास…

0

 

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

पारोळा तालुक्यातील मंगरूळ येथील बस स्थानकाजवळ असलेल्या मोबाईल इलेक्ट्रिकल तसेच जनरल स्टोअर्सचा पत्रा वाकवून अज्ञात चोरट्यांनी ३२०० रुपये रोख व मोबाईल व इलेक्ट्रिकचे साहित्य चोरून नेल्याची घटना घडली.

याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात कैलास सुकलाल पाटील मंगरुळ ता. पारोळा यांनी तक्रारी अर्ज दिला की, मी रात्री दुकान बंद करून घरी गेलो, त्यानंतर आज सकाळी दुकान उघडले असता मला माझे दुकानाच्या मागच्या बाजुचा पत्रा वाकवून आत प्रवेश करून अज्ञातानी दुकान फोडून दुकानातील मोबाईलचे साहित्य हेडफोन, ब्लूटूथ, चार्जर, बॅटऱ्या, चार्जिंग बॅटरी, मेमरी कार्ड, वायर, इलेक्ट्रिक साहित्य, मिक्सर, बॉडी, मीटरचे साहित्य, स्पीकर यासह 3200 रोख असे एकूण 11 हजार रुपयांच्या ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.