हॉटेल स्टाइल बनवा पालक पनीर !

0

खाद्यसंस्कृती विशेष

अनेक जणांना पालक आवडत नाही पण पालकामधे भरपूर जीवनसत्वे, लोह , कॅल्शियम असतात. हिमोग्लोबीन वाढीसाठी अत्यंत बहुगुणी मानला जातो. त्यातच पालकाला पनीरची जोड दिली तर अतिउत्तम.. चला तर घरच्या घरी हॉटेल स्टाइल पालक पनीर कशी बनवायची..

 

साहित्य:

२५० ग्रॅम पनीर

१ जुडी पालक

१ टोमॅटो

१०/१२ काजू

१ टीस्पून आले-लसूण पेस्ट

२ हिरवी मिरची

१ टेबलस्पून लाल तिखट

१ टेबलस्पून फ्रेश क्रीम

१ टेबलस्पून पनीर मसाला

१ टेबलस्पून तेल

१ टीस्पून हळद,

चवीनुसार मीठ

गरजेनुसार पाणी

 

कृती: 

१. प्रथम पालक निवडून स्वच्छ धुऊन घ्या. पनीर धुऊन कट करून घ्या.

२. एका पातेल्यात पाणी घेऊन त्यामध्ये टोमॅटो टाकून छान शिजवून घ्या साधारण पाच मिनिटांमध्ये टोमॅटो शिजतो.

३. आता यामध्ये पालकाची पाने ॲड करा आणि गॅस बंद करून पाच मिनिटे झाकून ठेवा.

४. आता पालकामधील सर्व पाणी काढून टाका आणि पालक आणि टोमॅटो थंड होऊ द्या टोमॅटोची साल काढून घ्या.

५. पालक थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक टोमॅटो आणि काजू ऍड करून छान बारीक पेस्ट तयार करून घ्या.

६. आता पॅनमध्ये तेल ऍड करून बारीक आचेवर गरम करा तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आले-लसूण पेस्ट, मिरची ऍड करून एक मिनिट परतून घ्या.

७. आता यामध्ये लाल तिखट, पनीर मसाला आणि तयार केलेली पालकाची पेस्ट ॲड करा.

८. चवीनुसार मीठ ऍड करून एक उकळी द्या.

९. आता यामध्ये कट केलेले पनीर ॲड करा आणि छान मिक्स करून वरतून फ्रेश क्रीम ॲड करा.

१०. झाकण ठेवून पाच मिनिटे वाफवून घ्या. मस्त पालक पनीर तयार पोळी/ रोटी/ नान किंवा भाताबरोबर सर्व्ह करा.

 

अपर्णा स्वप्निल कांबळे – नांगरे

पत्रकार/फुड ब्लॉगर

९८९२१३८१३२

Leave A Reply

Your email address will not be published.