आयपीएल सामन्याच्या दरम्यान ‘परिणीती भाभी जिंदाबादचा नारा’, वाचा सविस्तर

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

परिणिती चोप्राच्या (Parineeti Chopra) लग्नाच्या जोरदार चर्चा सुरू असतांनाच अभिनेत्री परिणीती चोप्राने आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढासोबत (Raghav Chadha) आयपीएल (IPL) मॅचला हजेरी लावली. यादरम्यान दोघेही मोहाली येथे एकत्र क्रिकेट मॅच एन्जॉय करताना दिसले. मोहालीच्या स्टेडियममध्ये परिणीती चोप्राला पाहून चाहत्यांनी ‘परिणिती भाभी’ जिंदाबाद अशा घोषणा दिल्या आणि हे सर्व पाहून अभिनेत्री चकित झाली. आणि चक्क स्वतःच्या डोक्याला हाथ मारून घेतला. या दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. स्टेडियमच्या एका स्टँडवर उभे असलेले परिणीती आणि राघव आणि दुसऱ्या स्टँडवरील प्रेक्षक ‘परिणीती भाभी जिंदाबाद’च्या घोषणा देतानाचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या घोषणा ऐकून दोघांनाही हसू अनावर झालं.

 

सध्या दोघांच्या एंगेजमेंटची बरीच चर्चा आहे. 13 मे रोजी दोघेही एंगेजमेंट करणार असल्याचे बोलले जात आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या आरोपपत्रात राघवचे नाव आल्यावर हा एंगेजमेंटचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आरोपपत्रात आरोपी म्हणून त्याचे नाव नाही. नुकतेच ईडीने त्याला चौकशीसाठी बोलावले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.