चित्रपटाची रिलीज डेट येण्यापूर्वीच प्रसिद्ध दिग्दर्शकाची झाली एक्झीट

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

मराठी कलाविश्वातुन अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे. ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक स्वप्निल मयेकर यांचे आज निधन झाले. पहाटे चेंबूरच्या घाटलागाव परिसरात राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले काही महिने ते आजारी होते. ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा त्याचा लेखक-दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा होता. हा चित्रपट उद्या रिलीज होणार असतानाच, आज त्यांच्यावर काळाने घाला घातला.स्वप्नील मयेकर यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असे त्यांचे कुटुंब आहे. ‘हा खेळ संचितांचा’ या मालिकेसाठी स्वप्निल यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केल होतं.

स्वप्नील मयेकर (Swapnil Mayekar) यांच्या निधनानं आता मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 5 मे रोजी म्हणजेच उद्या स्वप्नील मयेकर यांचा मराठी पाऊल पडते पुढे हा चित्रपट रिलीज होणार आहे. मात्र, हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच स्वप्नील मयेकर यांचे निधन झाल्याने या चित्रपटाच्या टीमवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.