भारतीय गणिती : आसा

0

लोकशाही विशेष लेख

 

आसा (Asa) हे वैदिक काळाच्या आरंभी होऊन गेलेले भारतीय गणितज्ञ होते. ते वायव्य भारतात राहत होते. त्यांनी जगात सर्वप्रथम दशमान पध्दतीची संकल्पना मांडली. आसांच्या पूर्वी एक ते नऊ हे अंक वापरले जात होते. तसेच शतपथब्राम्हण (२|३|१|९) या ग्रंथात शून्याची कल्पनाही मांडलेली होती. मात्र अंकाच्या स्थानावरून त्याची किंमत ठरेल ही संकल्पना कोणालाही सुचलेली नव्हती. ही कल्पना आसांना सुचली. दिलेला अंक हा नुसता लिहिला तर त्याची जेवढी किंमत होते त्याच्या दहापट किंमत तो अंक अन्य अंकाच्या डाव्या बाजुला लिहिल्यास होते असे मानावे, ही दशमान पद्धतीची पायाभूत कल्पना आहे.

उदा. ५ हा अंक शून्याच्या डाव्या बाजूला लिहिल्यास म्हणजेच पाचावर शून्य (५०) असे लिहिल्यास त्याची किंमत पाचाच्या दहापट म्हणजे पन्नास इतकी होते.

अरबांना ग्रीस या देशात वापरले जाणारे अंक देखील ठाऊक होते. ग्रीक अंक अल्फा, बीटा,… इत्यादी ग्रीक अक्षरांचा वापर करून लिहले जात. मात्र, स्थानावरून अंकाची किंमत ठरण्याची संकल्पना आसा यांनाच सुचली. याउलट, ग्रीक अंक लिहताना त्याच चिन्हांचा पुनःपुन्हा वापर करून ते लिहले जात आणि त्या अंकाची किंमत त्यातल्या चिन्हांच्या किंमतींच्या बेरजेएवढे मानली जाई. यामुळे गुणाकार, भागाकारासारख्या साध्या गणिती क्रिया देखील खूप अवघड वाटायच्या. हिंदासा अंकांमुळे गणित करणे खूपच सोपे झाले.

आज ही कल्पना आपल्या खुप परिचयाची असल्याने ती फारच सोपी भासते, पण जगातल्या विविध संस्कृतींमध्ये अंकांचा शोध लागूनही अंकांची किंमत ही त्याच्या स्थानानुसार बदलते, ही कल्पना कोणालाही सुचली नव्हती. त्यामुळे साधे गुणाकार, भागाकार करणेही खूप अवघड जात असे. अंकांच्या स्थानानुसार त्याची किंमत बदलते या आसांनी मांडलेल्या संकल्पनेतून जगाला अंकलेखनाच्या दशमान पध्दतीची देणगी मिळाली. अशा रितीने लिहिलेले आकडे हिंदासा (हिंद देशातील आसा) या नावाने ओळखले जाऊ लागले. आसांच्या या शोधामुळे गणिताची प्रगती वेगाने होण्याला हातभार लागला.

कु. गायत्री अशोक शिंदे
केसीई बी.एड. कॉलेज, जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.