युवकांचे मानसशास्त्र..व्यक्तिमत्व

0

लोकशाही, विशेष लेख

 

युवकांचे मानसशास्त्र या लेखमालेमध्ये ‘व्यक्तिमत्व’ हा शब्द किंवा संकल्पना सर्वांसाठी सर्वाधिक वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. कुठलाही सजीवा म्हटला म्हणजे त्याचे व्यक्तिमत्त्व हे आलेच. इतकेच नाही तर काही तत्त्वज्ञानी व्यक्ती, निर्जीव घटकांना देखील निश्चित स्वरूपाचे व्यक्तिमत्व असते, असे प्रतिपादित करतात किंवा सांगतात. ‘व्यक्तिमत्व’ ही संकल्पना फार व्यापक आहे. व्यक्तिमत्त्वाला इंग्रजी मध्ये ‘परसोन्यालिटी’ हा शब्द आहे. परसोना हा लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ मुखवटा असा आहे. व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीची शरीर रचना, वर्तन, विशेष, अभिरुची, क्षमता, आवडीनिवडी, योग्यता या सर्व गोष्टींचे वैशिष्ट्यपूर्ण संघटन होय. व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर प्रामुख्याने त्याच्या अनुवंशाचा आणि त्याच्या सर्व प्रकारच्या सभोवतालच्या परिस्थिती किंवा परिवेशाचा प्रभाव हा पडत असतो. त्यानुसार कुठलेही व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे आकाराला येत असते.

व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू असतात. त्यात प्रामुख्याने परिस्थितीशी समायोजन करणे. व्यक्तिमत्व ही एक मनो शारीरिक प्रणाली आहे. त्यात व्यक्तीच्या शरीराबरोबर विचार, स्मरण, भावना, प्रेरणा तसेच आचरण, वर्तन असे मानसिक आणि शारीरिक कार्य एकत्रितपणे चालत असते. व्यक्तिमत्वचे संघटन हे गतिशील असते. त्यात सतत विकास होत असतो. परिस्थितीचा आवश्यकतेनुसार त्यात बदल हे होत असतात.

व्यक्तिमत्व आकाराला येण्याची सुरुवात ही प्रामुख्याने जन्माला घालणाऱ्या माता पिता यांच्या शारीरिक संबंधांमधून, त्या वेळेची त्यांची मानसिक, शारीरिक स्थिती, सभोवतालचे वातावरण, त्यांचे डी.एन.ए आणि आर.एन.ए यापासून सुरुवात होऊन पुढे त्यात अनेक ज्ञात आणि अज्ञात घटक हे समाविष्ट होऊन परिस्थिती घटकांवरून प्रसंगानुरूप त्याबाबतच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू पडत जाऊन व्यक्तिमत्व हे हळूहळू आकाराला येते. व्यक्तिमत्व हे प्रयत्नपूर्वक विकसित करावे लागते. त्यासाठी सातत्याने प्रयत्न हे जाणीवपूर्वक करावे लागतात. ज्याप्रमाणे एखादा शिल्पकार हा किंवा मूर्तिकार हा मूर्ती घडविण्यासाठी एखाद्या निराकार दगडाची, मातीची किंवा धातूची, लाकडाची निवड करतो. मात्र सदरच्या घटक वस्तूंची निवड करीत असताना त्याला हे निश्चित माहित असते की या दगड, माती, धातूला प्रयत्नपूर्वक आकार दिल्यावर तो आकार धारण करण्याची आणि दिलेला आकार टिकवून धरण्याची मूलभूत क्षमता ही त्यात आहेच.

त्यानंतर तो कलाकार त्या दगड मातीला, लाकडाला आपल्या कौशल्य नुसार वेगवेगळे अवजार वापरत ठोकून ठाकूर छान अशा अर्थपूर्ण मुर्त्या बनवितो आणि ती माती दगड आपण होऊन हळूहळू आकार घेऊ लागतात. मग त्यात गौतम बुद्धांची मूर्ती असो, छत्रपती शिवाजी राजांची मूर्ती असो, पुतळे असो अशा एक ना अनेक महापुरुषांच्या देवी-देवतांच्या अर्थपूर्ण मुर्त्या या तो त्यावर वेगवेगळे संस्कार करीत आकाराला आणतो. व्यक्तिमत्व विकास ही देखील अशीच एक संस्कारित व आकार घेत प्रयत्नपूर्वक निरंतर प्रयत्नांनी विकसित करण्याची प्रक्रिया आहे.

युवा अवस्थेमध्ये व्यक्तिमत्व विकास ही प्रक्रिया फार जलद गतीने होत असते. या अवस्थेमध्ये युवक हे छान प्रभावी असे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या भावनिक दृष्ट्या परिपक्व झालेले असतात. आपली छाप समोरच्या व्यक्तींवर समाजावर समूहावर पडेल, यासाठी युवक, युवती जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. या अवस्थेत प्रामुख्याने आपले व्यक्तिमत्व उमटून पडते. ते आपल्या संवाद कौशल्यातून, आपल्या स्वयंशस्तीमधून, आपल्या मित्रपरिवारातून, आपल्या शिक्षणातून, आपण करीत असणाऱ्या कार्यान मधून, आपल्या तत्परते मधून, प्रामाणिकपणा मधून, आपण केलेल्या मदत कार्य, समाजाप्रती दिलेल्या योगदाना मधून, आपल्यात असणाऱ्या नेतृत्व गुणांमधून, आपण घेतलेल्या प्रभावी निर्णयांमधून, आपल्या महत्त्वाकांक्षा, आपण ठरवलेल्या उद्दिष्टात मधून, आपल्याला असणाऱ्या सवयी मधून आपले असणारे आर्थिक उत्पन्नाच्या स्त्रोतांमधून, व्यक्तिमत्व विकास प्रक्रिया सुरू असताना त्यात अनेक अडथळे हे देखील येतात. परंतु त्यातून अत्यंत चिकाटीने प्रयत्नपूर्वक त्या आलेल्या अडथळ्यांवर प्रत्येक वेळी मात करत आपला व्यक्तिमत्व विकास हा निरंतर आपण स्वतःहून करायचा असतो. व्यक्तिमत्व विकास हा काही दोन-तीन दिवसांचा व्यवसायिक कार्यशाळेमध्ये जाऊन विकसित करण्याचा प्रकार नाही. त्यासाठी जाणीवपूर्वक निरंतर प्रयत्न आणि मार्गदर्शन हे आवश्यक असते.

युवा अवस्थेतील व्यक्तिमत्व विकासाची पंचसूत्री म्हणजे स्वयंशिस्त, व्यायाम, योग अभ्यास, योग्य आहार-विहार, पुरेशा प्रमाणात झोप आणि निसर्गाशी एकजीव होऊन केलेली मैत्री, दिलेला वेळ, घेतलेले निरीक्षणे होय. सोबतच भेटेल ती व्यक्ती आणि हाती लागेल ते पुस्तक वाचणेही होय.

प्रो. डॉ. आशिष एस. जाधव/बडगुजर.
पंकज कला वरिष्ठ महाविद्यालय, चोपडा.
9373681376

Leave A Reply

Your email address will not be published.