आगरी स्टाईल भरलेल्या खेकड्याचे झणझणीत कालवण

0

खाद्यसंस्कृती विशेष

महाराष्ट्र खाद्य संस्कृतीतील विशेषतः आगरी-कोळी खाद्य संस्‍कृतीतील एक आवडता पदार्थ म्हणजे चिंबोरी म्हणजेच खेकडा. नाव घेताच डोळ्यांसमोर खेकड्याचे झणझणीत कालवण, भरले खेकडे, खेकडा लॉलीपॉप आले. चला तर मग आज आपण भरलेल्या खेकड्याचे कालवण कसे बनवायचे ते पाहुयात..

साहित्य:

* खेकडे ५-६
* १/२ टि.स्पून मालवणी मसाला
* आले-लसूण पेस्ट
* हळद
* टोमॅटो
* बेसन पिठ बारिक चिरलेला कांदा
* तेल कोथिंबीर मीठ
* आले-लसूण पेस्ट
* सुके खोबरे
* हळद
* कांदा
* मीठ
* कोथिंबीर
* गरम मसाला

कृती:

रस्सासाठी:

* खेकड्याची नांगी काढून साफ करून घ्या, छोटी नांगी मिक्सरमध्ये वाटून त्याचा रस काढून घ्या फोडणीला देताना त्याचा वापर करा रस्सा छान लागतो.

वाटण:

* सूके खोबरे, कांदा तेलात भाजुन घ्या.
* आल लसुन पेस्ट कोथिंबीर वाटुन घ्या.
* तेलात खेकडे परता त्यात मिठ हळद ,गरम मसाला पावडर, तिखट मसाला घाला, खेकडे परतत असताना वाटण मिक्स करा, पाणी ओतून घ्या आणि उकळी फुटु द्या.

खेकड्याचे सारण:

* बेसन पिठ, बारिक चिरलेला कांदा, टोमेटो, १ हिरवी मिरची, कोथंबीर ,आले लसुन पेस्ट, मीठ हळद , १/२टिस्पून गरम मसाला पावडर , १/२ टिस्पून लाल तिखट मिश्रण एकत्र करुन खेकड्यांच्या वाटित भरा.

* खेकड्याच्या रश्याला उकळी आली की वाट्या अलगद रश्यात सोडा.

* वाट्या रश्यात उतरतिल.
* वाट्या वर आल्यावर शिजल्या म्हणुन समजा.
* गरमागरम सर्व्ह करा.

अपर्णा स्वप्निल कांबळे-नांगरे
पत्रकार/फुड ब्लॉगर, मुंबई
मो. ९८९२१३८१३२

Leave A Reply

Your email address will not be published.