काश्मिरी मटण चॉप्स बनवा घरच्या घरी

0

खाद्यसंस्कृती विशेष

जेव्हा जेव्हा आपण काश्मिरी पाककृतींबद्दल बोलतो, तेव्हा त्याच्या विविध मांस-आधारित पदार्थांचा नेहमीच विशेष उल्लेख केला जातो. म्हणून आपण आज अस्सल मांसाहार प्रेमींसाठी खास चमचमीत काश्मिरी मटण चॉप्सची अगदी सोपी रेसिपी पाहणार आहोत..

साहित्य:

* १० चॉप्स बेस्ट

* ६ हिरवी वेलची

* २ चमचे बडीशेप

* ५ लवंगा

* २ मध्यम दालचिनीचे तुकडे

* ४ कप दूध

* अर्धा वाटी बेसन

* पाव वाटी मिरचीपूड

* अर्धा चमचा हिंग

* १ लिंबाचा रस

* अर्धा कप तूप

 

कृती:

* प्रथम वेलची, लवंग, दालचिनी व बडीशेप एका कापडाच्या तुकड्यात बांधून त्याची पुरचुंडी करा.

* मोठ्या पसरट पातेल्यात चॉप्स घालून त्यात दूध, अर्धा लिटर पाणी व ही मसाल्याची पुरचुंडी घालून ४० मिनीटे मध्यम गॅसवर चॉप्स शिजेपर्यंत व पाणी आटेपर्यंत ठेवा.

* चॉप्स शिजत असतानाच बेसन व तांदळाचे पीठ, थोडे पाणी घालून भज्याच्या पिठासारखे भिजवा.

* पिठामध्ये मीठ, लाल मिरचीपूड, हिंग घालून फेटा.

* शिजलेले मटण चॉप्स खाली उतरवून जरा थंडा करा.

* कढईत तूप तापवून त्यात चॉप्स पिठात घालून हलकेच सोडा व सोनेरी रंगावर तळून घ्या.

* गरमागरम काश्मिरी मटण चॉप्स चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा.

 

अपर्णा स्वप्निल कांबळे-नांगरे

पत्रकार/फुड ब्लॉगर, मुंबई

मो. ९८९२१३८१३२

Leave A Reply

Your email address will not be published.