जळगाव शहरातील पाणीपुरवठा एक दिवस उशिरा

0

जळगाव : जळगाव शहरातील अमृत योजनेच्या ८०० मी.मी. व्यासाची पिंप्राळा मुख्य जलवाहिनी जोडणी गिरणा पंपींग रोड येथे दि.५ ऑगस्ट रोजी करण्यात येणार असल्यामुळे शहरातील पाणी पुरवठा खंडीत होणार आहे.

त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात येत असून दि.५ रोजी होणाऱ्या भत्तगाची पाणी पुरवठा दि.६ रोजी करण्यात येईल, तसेच दि.६ रोजी व दि. ७ रोजी पाणी पुरवठा अनुक्रमे दि. ७ व ८ रोजी करण्यात येणार आहे त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.