चिमुकलीचे अपहरण करून खून केल्याकरणी आरोपीला कोठडी

0

जळगाव : भडगाव तालुक्यातील एका गावामधील सात वर्षीय चिमुकलीचे अपहरण व खून केल्याप्रकरणी स्वप्निल उर्फ सोन्या विनोद पाटील (वय १९) याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्याला ९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

३०’ जूलै रोजी सात वर्षीय चिमुकली ही बेपत्ता झाली होती. दोन दिवसांनी तिचा मृतदेह कडब्याखाली आढळून आला होता. चौकशीअंती स्वप्निल यानेच तिचा खून केल्याची बाब समोर आल्यानंतर गुरुवारी त्याला अटक करण्यात आली होती. शुक्रवारी भडगाव पोलिसांनी त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्याला ९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.