पाळधीत ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू

0

पाळधी ता. धरणगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील पाळधी गावात मंगळवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान दगडफेक झाली होती. यानंतर एरंडोल प्रांतधिकाऱ्यांनी पाळधी गावात ३१ मार्चपर्यंत गावात संचारबंदी लागू केली आहे.

तालुक्यातील पाळधी गावात मंगळवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान दगडफेक झाली होती. एका धार्मिक स्थळाजवळून काही जण जात असताना अचानक दगडफेक झाली. त्यात पोलिसासह तीन जण जखमी झाले. हल्लेखोरांनी तीन वाहनांचे तसेच काही दुकानांची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील १०० हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर एरंडोल प्रांतधिकारी विनय गोसावी संचारबंदी बाबतचे काढलेल्या आदेशात काढले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.