बाप्पाच्या आगमनाला पाळधीकरांचा सजीव देखावा !

पाळधी येथील या मंडळाची पहिलाच वर्षाची संकल्पना

0

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क 

श्री गणेश उत्सव पाळधी येथे सात दिवसाचा असला तरी त्या सात दिवसांसाठी त्यांना एखाद्या सेलिब्रेटप्रमाणे वागणूक मिळत असते त्यामुळे यावर्षी मानाचा गणपती सह या खास देखाव्याच्या आयोजन जीपीएस गणेश मित्र मंडळाने केलं आहे. या मंडळाला भेट द्यायला विसरू नका.

आपल्या सगळ्यांचा लाडक्या बाप्पांच आगमन हे आता काही तासांवर आला आहे आणि प्रत्येक घराघरात त्यांचा आगमनाची तयारी देखील सुरू झाली आहे.  घराप्रमाणेच प्रत्येक मंडळ देखील यावर्षी नवीन काय करायचं मंडपाची सजावट कशी करायची कार्यक्रम कोणते ठेवायचे याची तयारी करत आहेत. आता गणेशोत्सव केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर देखील युके, कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यासारख्या देशात साजरा केला जातो तरीही विशेष आकर्षण हे मात्र मुंबई पुण्यातल्या देखाव्यांचाच असतं असं म्हणायला हरकत नाही.  मुंबईतील लालबागचा राजा, मुंबईचा राजा गिरगावचा राजा हे प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे पुण्यातल्या कसबा पेठ गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग, केसरी वाडा या मानाचा गणपतीसह दगडूशेठ गणपतीला भेट देण्यासाठी सुद्धा प्रचंड लोक गर्दी करतात. पुण्यातील या खास गणेशोत्सवा बाबत अजून एक खास आकर्षण म्हणजे सजीव देखावा जिवंत..

त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यात देखील विविध मंडळांची देखाव्या करिता स्पर्धा सुरू असते. आता याच स्पर्धेत पाळधी येथील जीपीएस गणेश मित्र मंडळ देखील सहभागी झाले आहे आणि पहिलाच वर्षी त्यांनी श्री पशुपतिनाथ महादेव मंदिर नेपाळ त्याचे आयोजन केले आहे. याकरिता मंडळाचे सर्व सदस्य सक्रिय सहभाग घेऊन मेहनत करीत आहेत.

समस्त पंचक्रोशीत या मंडळाच्या देखाव्याची चर्चा रंगू लागल्याने गणेश उत्सव सुरू झाल्यावर या ठिकाणी बाप्पाच्या दर्शनासाठी रांगा लागल्याशिवाय राहणार नाही याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.