भयंकर ! एकाच घरात सापडले 11 मृतदेह

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

पाकिस्तानातून एक भयंकर घटना समोर आलीय. पाकिस्तानमधील गावात एका घरात 11 जणांचे मृतदेह पोलिसांना सापडले आहेत. हे प्रकरण पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील लक्की मारवतचे आहे. हे सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

11 मृतदेह सापडले

मिळालेल्या माहितीनुसार,  लक्की मारवत जिल्ह्यात तख्ती खेल नावाचे एक गाव आहे, जिथे पोलिसांना 11 मृतदेह सापडले आहेत. हल्लेखोराने एकाच कुटुंबातील 11 जणांची हत्या केली. मृत कुटुंबात दोन भाऊ, त्यांची मुले आणि त्यांच्या घरी आलेल्या पाहुण्यांचा समावेश आहे. कुटुंबातील सदस्य घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

घरात घुसून.. 

घटनेची माहिती मिळण्याच्या दोन दिवस आधी या सर्वांचा मृत्यू झाला होता. विषारी पदार्थ अन्नात मिसळल्याने या सर्वांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस तपासानुसार हल्लेखोर हा पीडित कुटुंबाशी संबंधित असू शकतो, कारण त्याने घरात घुसून ही घटना घडवली. घटनेनंतर हल्लेखोराने घराचे गेट बाहेरुन बंद करुन तेथून पळ काढला.

तपास सुरु

या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. त्यांनी घटनास्थळावरुन पुरावे गोळा केले. प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे की, दोन दिवसांपूर्वी कुटुंबातील एका सदस्याने वझिरीस्तानमधून जेवण आणले होते, जे खाल्ल्यानंतर सर्वांचा मृत्यू झाला. सध्या या घटनेचा आसपासच्या भागात तपास सुरु असून पोलिसांनी हा परिसर सील केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.