मोमोज खाणे बेतले जीवावर, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

देशाची राजधानी दिल्लीत एक धक्कादायक बाबा समोर आली असून, रस्त्याच्या बाजूला मोमोज खाणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. येथे गुंडानी एका व्यक्तीला फक्त चटणी मागितली म्हणून गंभीररीत्या जखमी केलं आहे. त्यानंतर त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना दिल्लीच्या फर्श बाजार परिसरात झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भीकम सिंह कॉलनी भागात चटणी मागितली म्हणून चाकूने हल्ला करण्यात आला. एका व्यक्ती येथे मोमोज खात होता मात्र त्याच्यासोबत जास्त चटणी मागत असल्याने त्याच्यावर हल्ला करण्यात आला आहे. हल्ला करणाऱ्या व्यक्तींनी दुकानदाराची बाजू घेत हा हल्ला केल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये म्हंटले आहे. या हल्ल्यात तो व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.

दिल्लीतील भीकम सिंह कॉलनी परिसर हा वर्दळीचा भाग आहे. येथे ग्राहकाने मोमोज सोबत जास्तीची चटणी मागीतल्याने मोमोज कॉर्नर मालक आणि ग्राहक यांच्यात वाद झाला. यावादात हा चाकू हल्ला करण्यात आला. ज्यामध्ये ग्राहक जखमी झाला, त्यानंतर त्याला जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. पोलीस घटनेचा तपास करत आहेत, मात्र या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाहीये.

Leave A Reply

Your email address will not be published.