Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»पिस्टल व जिवंत काडतुसासह तरुण पोलिसांच्या जाळ्यात
    गुन्हे वार्ता

    पिस्टल व जिवंत काडतुसासह तरुण पोलिसांच्या जाळ्यात

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 19, 2023Updated:September 19, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क 

    तालुक्यातील गोराडखेडा येथे एका २६ वर्षीय तरुणाजवळ ५ जिवंत काडतुसासह एक पिस्टल आढळुन आली आहे.  ऐन गणपती उत्सवाच्या पुर्व संध्येला पाचोरा पोलिसांनी सापळा रचून तरुणास जाळ्यात घेतल्याने पुढील होणारा अनर्थ टळला असुन पाचोरा पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास गोराडखेडा गावातील गैइबन शहा अली बाबा दर्ग्याजवळ एक तरुण कमरेला पिस्टल लावुन फिरत असल्याची माहिती गुप्त खबऱ्या कडुन पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस काॅन्स्टेबल योगेश पाटील यांना मिळाली. सदरची माहिती पो. काॅ. योगेश पाटील यांनी तात्काळ पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना दिल्याने त्यांनी लगेचच पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पो. काॅ. योगेश पाटील, राहुल बेहरे, विश्वास देशमुख, प्रकाश शिवदे, संदिप भोई, विनोद बेलदार यांचे पथक तयार करुन घटना स्थळाकडे रवाना केले.

    पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांनी साध्या गणवेशात सापळा रचून संशयीत तरुणास पिस्टल व जिवंत काडतुससह शिताफीने ताब्यात घेतले. याप्रकरणी पो. काॅ. योगेश पाटील यांच्या फिर्यादीवरून गौरव राजेंद्र पाटील (वय २६, रा. गोराडखेडा ता. पाचोरा) याचे विरुध्द भाग – ६ गु. र. नं. ३४३ / २३ भादवी शस्त्र अधिनियम कायदा कलम ३ / २५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असुन गौरव राजेंद्र पाटील याचेकडुन २५ हजार रुपये किंमतीची पिस्टल व ५ जिवंत काडतुसे तसेच त्याच्या ताब्यातील ४० हजार रुपये किंमतीची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.

    या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे हे करीत आहे. आज १८ सप्टेंबर रोजी गणपती उत्सवाच्या पुर्व संध्येला शहरात सर्वत्र खरेदीची वर्दळ सुरू असतांना शहरापासुन दोन कि. मी. अंतरावर जिवंत काडतुसे व पिस्टल बाळगणारा तरुण पाचोरा पोलिसांच्या सापळ्यात अडकल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे पुढील होणारा अनर्थ टळल्या पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या सह तपास पथकाचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

    #pachora crime news pistol
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026

    मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!

    August 8, 2026

    15 ऑगस्टपूर्वी मुंबईत स्फोट घडवण्याची धमकी

    August 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif