Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»धावत्या रेल्वेतून पडल्याने इसमाचा दुर्दैवी मृत्यू
    जळगाव जिल्हा

    धावत्या रेल्वेतून पडल्याने इसमाचा दुर्दैवी मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 19, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क 

    पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान धावत्या रेल्वेतून पडल्याने झारखंड येथील ३७ वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज १८ सप्टेंबर रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    १८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास भुसावळकडुन नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या काशी एक्सप्रेस (क्रं. १५०१८) यातुन प्रवास करणारे उमेश बन्सी राणा (वय ३७, रा. बेको ता. पिपचो, जि. कोडरमा, झारखंड) हे धावत्या एक्स्प्रेसमधुन अचानक पडल्याने रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३८२ / १६ / १८ नजीक (वडगाव बु” शिवार) दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.

    घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल मुकुंद परदेशी यांचेसह जय मल्हार रुग्णवाहिकेचे चालक किशोर लोहार व अमोल पाटील हे घटनास्थळी दाखल होवुन घटनास्थळाचा पंचनामा करत रुग्णवाहिका चालक किशोर लोहार व अमोल पाटील यांच्या मदतीने मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

    घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल मुकुंद परदेशी हे करीत आहे. मयत उमेश बन्सी राणा हे नाशिक येथे फर्निचर कामासाठी जात असतांनाच ही दुर्दैवी घटना घडली असुन उमेश बन्सी राणा यांचे पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुलं, दोन मुली, पाच भाऊ असा परिवार आहे.

    #pachora crime news
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026

    मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!

    August 8, 2026

    धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदील

    August 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif