सहकाऱ्यांच्या वाईट वागणुकीमुळे चेतेश्वर पुजारावर बंदी !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारतीय संघाचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) इंगंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत आहे. पण सहकाऱ्यांच्या कृतीमुळे त्याच्यावर एका सामन्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

पुजाराची गणना टीम इंडियाच्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये होते. मात्र, वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला संघातून वगळण्यात आले होते. पुजारा बऱ्याच काळापासून काउंटी क्रिकेट खेळात आहे आणि ससेक्सचा कर्णधार देखील आहे. ईसीबी कडून पुजारावर एक सामन्याची बंदी लादण्यात आली आहे. खेळाडूंच्या वाईट वागणुकीमुळे ससेक्सवर १२ गुणांचं दंड ठोठावण्यात आला असून, कर्णधार पुजारावर बंदी घालण्यात आली आहे. आता पुजारा ससेक्सकडुन पुढचा सामना खेळू शकणार नाही. त्यामुळे संघाला मोठा धक्का बसला आहे.

जॅक कार्सन, टॉम हेन्स आणि एरी कार्वेलास यांच्यामुळे ससेक्स संघाला एकाच हंगामात 4 पेनल्टी मिळाल्या आहेत. ईसीबीने ससेक्स संघाविरुद्ध ही कारवाई केली. कारण त्यांना त्याच हंगामात चौथ्यांदा दंड ठोठावण्यात आला होता आणि संघाचा कर्णधार चेतेश्वर पुजाराने त्यास सहमती दर्शवली आणि सर्व आरोप मान्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.