वाघाचे कातडे विकणाऱ्या ३ आरोपींना अटक, वाचा सविस्तर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

वाघाचे कातडे विकणाऱ्या महाबळेश्वरच्या तिघांना अटक करण्यात आली आहे. बोरिवली येथील एलआयसी मैदान परिसरात वाघाचे कातडे आणि वाघ नखे विकणाऱ्या तिघांचा यात समावेश आहे. त्यांच्याकडून ११४ सेमी लांब १०८ सेमी रुंद आणि बारा वाघ नखे असा १० लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तिघ आरोपींवर वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संदीप आनंदराव परीट यांनी फिर्याद दिली असून, सुरज लक्ष्मण कारंडे(वय ३०, रा. बिरवाडी ता. महाबळेश्वर) मोहसीन नजीर जुंद्रे (वय ३५, रा. रांजणवाडी महाबळेश्वर) व मजूर मुस्तफा मानकर (वय ३६ रा. नगरपालिका सोसायटी महाबळेश्वर) अशी संबंधित आरोपींचे नवे आहे.

पोलीस उपनिरीक्षक अखिलेश बॉम्बे यांना महाबळेश्वर येथील काही लोक वाघाचे कातडे एलआयसी मैदान परिसरात विकायला येणार असल्याची माहिती मिळाली होती पोलीस उपयुक्त अजयकुमार बन्सल यांच्या सूचनेनुसार मैदान परिसरात सापळा रचण्यात आला आणि तिघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून वाघाचे कातडे आणि नखे जप्त करण्यात आली वाघ नखे आणि वाघाची कातडे असा १० लाख ८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब पोलीस निरीक्षक भालचंद्र शिंदे, अखिलेश बॉम्बे, प्रवीण चोपडे, संदीप परीट, प्रशांत ठोंबरे, गणेश शेरमाळे यांनी या कारवाईत भाग घेतला होता. या प्रकरणाची सातारा वनविभागाला कोणतीही माहिती नव्हती असे समोर आले आहे. आदिती भारद्वाज यांना याबाबत संपर्क साधला असता या प्रकरणाची माहिती घेऊन पुढील कारवाईची दिशा निश्चित करण्यात आले असे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.