गणपती बाप्पाच्या स्थापनेचा शुभ मुहुर्त

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

श्रावण संपला रम्य चतुर्थीची पहाट झाली 

सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे

आली आली गणाधीशाची स्वारी आली 

भाद्रपद महिन्यात येणारी चतुर्थी श्री गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते. यादिवशी गणेश स्थापना करून दहा दिवसाचा गणेशोत्सव साजरा केला जातो. श्रावण अमावस्या म्हणजेच पिठोरी अमावस्येनंतर भाद्रपद महिना सुरू होतो आणि भाद्रपद महिन्यातील विनायक चतुर्थी खूप खास मानली जाते. असे मानले जाते की विनायक चतुर्थीच्या दिवशी मध्यान्हकाळात गणेश पूजन केले जाते. सामान्यपणे विनायक चतुर्थीचा उपवास मध्यान्हच्या वेळी म्हणजेच दुपारी सोडला जातो. गणेश चतुर्थी हा भगवान गणेशाचा  जन्मदिवस म्हणून संपूर्ण देशभरात दरवर्षी साजरा करण्यात येणारा उत्सव आहे.

गणेश चतुर्थीचा सण चातुर्मासात येतो. यादिवशी पार्थिव गणेशाची स्थापना होते आणि दहा दिवसानंतर अनंत चतुर्थीला गणेश मुर्ती विसर्जीत केली जाते. दहा दिवसाचा हा उत्सव मोठ्या थाटामाटात केला जातो. सर्व देवतांच्या आधी गणपतीची पूजा केली जाते यामुळे विनायक चतुर्थीचं देखील वेगळं महत्व आहे. विनायक चतुर्थी सर्व कार्यात यश आणि सिद्धी देणारी आहे. गणपती हा विघ्नहर्ता असल्याने घरावर येणाऱ्या विघ्नांचे म्हणजे संकटांचे तो निवारण करेल ही भावना त्यामागे असते.

 

शुभ मुहूर्त 

यंदाच्या वर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थी १९ सप्टेंबर २०२३ ला आहे. पंचांगानुसार, १८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजून ३९ मिनिटांनी चतुर्थीला प्रारंभ होईल आणि १९ सप्टेंबर रोजी १ वाजून ४२ मिनिटांनी चतुर्थी समाप्त होईल. त्यामुळे श्री गणेश चतुर्थी उदयोतिथीनुसार १९ सप्टेंबरला साजरी केली जाईल आणि या दिवसापासूनच गणेशोत्सवाला सुरुवात होईल. श्री गणेशाची स्थापना करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी ११ वाजून ७ मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ३४ मिनिटांपर्यंत आहे.

बाप्पाच्या आगमनाने आपल्या आयुष्यात

भरभरून सुखसमृद्धी येवो

हीच गणरायच्या चरणी प्रार्थना 

लोकशाही लोकलाईव्ह परिवाराकडून  गणेश चतुर्थीच्या  हार्दिक शुभेच्छा

Leave A Reply

Your email address will not be published.