सावधान ! 8 दिवसांचा अशुभ काळ; होळीपर्यंत ही कामं टाळा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

हिंदू शास्त्रामध्ये काही शुभ – अशुभ काळ सांगितला असून या काळात कोणती कामे करावी आणि कोणती कामे करू नये याची देखील सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार यंदा होलाष्टक हा फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून सुरू होतो. होळीच्या आधीच्या 8 दिवसांना होलाष्टक म्हणतात. होळी दहनाच्या दिवशी होलाष्टक संपते. होलाष्टकाच्या काळात सर्व प्रमुख ग्रह उग्र स्वरूपाचे असल्याने या काळात कोणतीही शुभ कार्ये केली जात नाहीत.

होलाष्टकाची आख्यायिका

होलाष्टकाच्या काळात, भक्त प्रल्हादाला त्याचे वडील हिरण्यकश्यप यांनी अनेक त्रास दिले होते जेणेकरून तो हरिभक्ती सोडून हिरण्यकश्यपची पूजा करेल. पण, प्रल्हादानं ते मान्य केले नाही आणि विष्णूची पूजा चालू ठेवली. तेव्हा भगवान विष्णूंनी नरसिंहाचा अवतार घेऊन हिरण्यकश्यपाचा वध करून भक्त प्रल्हादाचे रक्षण केले. अशी आख्यायिका सांगण्यात येते.

होलाष्टकाची सुरुवात आणि समाप्ती 

या वर्षी फाल्गुन शुक्ल अष्टमी तिथी 16 मार्च रोजी रात्री 09:39 पासून सुरू होत असून 17 मार्च रोजी सकाळी 09:53 वाजता समाप्त होत आहे. उदयतिथीनुसार फाल्गुन शुक्ल अष्टमी तिथी 17 मार्च रोजी आहे, म्हणून 17 मार्चपासून होलाष्टक सुरू होत आहे. तर 17 मार्चपासून सुरू होणारे होलाष्टक फाल्गुन पौर्णिमेला होळी दहनाने समाप्त होईल. यंदा होळी दहन 24 मार्चला होणार आहे. त्यामुळे 24 मार्चला होळाष्टकही संपणार आहे. दुसऱ्या दिवशी 25 मार्च रोजी धूलिवंदन साजरे केले जाते.

होलाष्टकात ही कामे करू नये 

1) कोणतंही शुभ कार्य करू नये.

2) कोणतेही नवीन काम, नवीन दुकान किंवा नवीन व्यवसाय सुरू करू नये.

3) लग्न, बारसं, गृहप्रवेश यांसह कोणतेही मोठे संस्कार किंवा विधी करू नयेत.

होलाष्टात काय करावे?

1) होलाष्टकचे 8 दिवस तपश्चर्येसाठी, मंत्र, पठणासाठी असतात.

2) या काळात चांगले आचरण, संयम आणि ब्रह्मचर्य पाळा.

3) होळी दहनाच्या ठिकाणी दररोज लाकडाचे छोटे तुकडे गोळा करून ठेवावीत.

4) या काळात व्यक्तीने आपल्या क्षमतेनुसार अन्न, वस्त्र, पैसा आणि इतर वस्तूंचे दान करावे. यामुळे पुण्य प्राप्त होते.

5) होलाष्टकचे 8 दिवस जप, तंत्र, मंत्र साधना आणि अध्यात्मिक कार्यासाठी चांगले आहेत. तंत्र साधना आणि सिद्धीसाठी हा सर्वोत्तम काळ आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.