नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाशिवरात्री निमित्त उपवास असल्याने शिंगाड्याचे पीठ खाणाऱ्या भाविकांना विषबाधा झाल्याची घटना नागपूरमधून समोर आलीय. नागपूरातील हिंगणा, कामठी या दोन तालुक्यातील तब्बल 100 च्या वर नागरिकांना विषबाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाने शिंगाड्याच्या पिठाचे नमुने घेतली असून पुढील चौकशीला पाठवले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या भाविकांनी हे शिंगाड्याचे पीठ खाल्ले त्याची मुदत संपली होती, आणि याच शिंगाडाच्या पिठापासून तयार केलेल्या उपवासाच्या फराळाचे पदार्थ खाल्याने नागपूर जिल्ह्यात 100 हून अधिक जणांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शहरातल्या विविध भागांमध्ये सीलबंद शिंगाडा पिठाची विक्री करणाऱ्या एकमात्र ब्रांडमुळे हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येतंय. घडलेल्या प्रकारामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केला जात आहे. हा भेसळीचा प्रकार असल्याचा संतापही नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
शिंगाडा पिठापासून बनविलेले अन्न पदार्थ खाल्याने या नागरिकांना उलट्या, हगवण, पोटदुखी, अंगदुखी सारखी लक्षणे आढळल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या सर्वांनी विकत घेतलेले शिंगाडाचे पीठ एकाच कंपनीचे असून या पिठाची मुदत संपल्याची माहिती मिळाली आहे. मुदत संपल्यांतरही दुकानदारांनी ते पीठ नष्ट न करता विक्री केल्याने हा प्रकार घडल्याचेही समोर येत आहे. त्यामुळे या नागरिकांनी ज्या दुकानांमधून हे पीठ विकत घेतले होते.