… तर या कारणाने अंघोळ न करणारी तरुणी

0

वॉशिंग्टन :  सध्या सोशल मीडियावर अशीच एक तरुणी चर्चेचा विषय बनली आहे; जिने अनेक वर्षांपासून अंघोळच केलेली नाही. आपण अंघोळीचा कंटाळा असणारे, दोन-तीन दिवसातून एकदाच अंघोळ करणारे किंवा आठ दिवसांतून एकदा अंघोळ करणारे लोक पाहिले आहेत. मात्र अंघोळ करत नाही अशी व्यक्ती क्वचितच आपल्याला माहिती असेल. पण ही २२ वर्षीय तरुणी अंघोळच करत नाही, म्हणून सध्या चर्चेत आली आहे.जगभरात विविध प्रकारचे करामती लोक असून ते त्यांच्या विचित्र कामगिरीमुळे सतत चर्चेत असतात.

खरं कारण म्हणजे या २२ वर्षीय तरुणीला पाण्याची अॅलर्जी असल्याने ती अंघोळ करत नाही. मॉन्टेफुस्को असे या तरुणीचे नाव आहे. यूएसच्या साऊय कॅरोलिया येथे राहणारी मॉन्टेफुस्को एका गंभीर आजाराने ग्रस्त आहे. जेव्हा तिला तिच्या शरीरासंबंधित काही विचित्र बाबी जाणवू लागल्या, तेव्हा ती डॉक्टरांकडे गेली आणि तिला आरोग्याच्या समस्येबद्दल कळले. त्यावेळी ती केवळ १२ वर्षांची होती. मॉन्टेफुस्कोने अंघोळ केल्यानंतर तिच्या अंगावर तीव्र खाज सुटते व लहान पुरळ उठते. त्यामुळे तिला अंघोळ करता येत नाही.

‘मला अंघोळ करताना किंवा इतर कोणत्याही वेळी पाण्याच्या संपर्कात येताच माझ्या त्वचेला खाज सुटते आणि हा त्रास हळूहळू वाढतच जातो. अंघोळीनंतर स्क्रबिंग आणि शेव्हिंग करताना मी हवेच्या संपर्कात येताच हा त्रास अधिक वाढतो, अशी माहिती मॉन्टेफुस्कोने दिली आहे.’ मॉन्टेफुस्कोला आंघोळ न उपलब्ध नाही. केल्याचा पश्चात्ताप होतो, मात्र तिला तसेच करावे लागते. ही तिची अडचण आहे. अंघोळ करताच तिचा त्रास वाढतो. स्वतःला स्वच्छ ठेवण्यासाठी ती ड्राय शॅम्पू आणि बॉडी वाइप्सचा वापर करते.

मॉन्टेफुस्कोने जेव्हा सोशल मीडियावर तिच्या समस्येबद्दल शोध घेतला, तेव्हा तिला इतर लोकांबद्दल माहिती मिळाली, ज्यांना पाण्याची अॅलर्जी असून त्यांनीही अनेक वर्षांपासून अंघोळच केलेली नाही. दरम्यान, आतापर्यंत वैद्यकीय क्षेत्रात अशा आरोग्य समस्येच्या केवळ ३७ प्रकरणांची नोंद आहे. त्यापैकी मॉन्टेफुस्को एक असून सध्या तरी या समस्येवर कोणताही उपचार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.