पाचोर्‍यात अवैध खतांच्या साठ्याचा पर्दाफाश

0

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

जारगाव शिवारातील गोडावूनमधून राज्यात विक्रीस बंदी असलेला रासायनिक खतांचा साठा जप्त करत कृषी खात्याच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. पाचोरा शहरालगत असलेल्या जारगाव शिवारात एका व्यक्तींच्या गोडावून मधे गुजरात येथील मिल्सन फार्मास कंपनीने तयार केलेल्या बोगस रासायनिक खतांची विक्री गावोगावी जावून शेतकऱ्यांना विक्री होत असल्याची माहिती जळगाव येथील कृषी विभागाचे नियंत्रक अरुण तायडे यांना गुप्त माहिती मिळाली होती.
त्या माहितीच्या आधारे जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा येथील उपविभागीय कृषी अधिकारी नंदकिशोर नयनवाड, पाचोरा पंचायत समितीचे कृषी अधिकारी एम. एस. भालेराव, कृषी सहाय्यक रामेश्वर पाटील, संदिप कच्छवे, अविनाश चंदिले, अरुण तायडे असे पथक तयार करून जारगाव येथील मधूकर शंकर भोकरे रा. शिवाजी नगर पाचोरा यांचे मालकीचा गोडावून जवळ पोहचले गोडावूनच्या दरवाजाच्या फटीतून बघीतले असता खतांचा साठा आढळून आला.

याबाबत अधिकारी यांनी परवाना मागीतला असता उडवा उडीचे उत्तरे देण्यात आली. या छाप्यात सदर गोडावून मध्ये २०७ खतांचा बॅगा किंमत २ लाख ३८ हजार ६२९ रुपये बोगस रासायनिक खते आढळून आली दरम्यान, गोडावून मालक मधूकर भोकरे यांना फोन केल्यावर ते बाहेरगावी असल्याचे त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना सांगितले. सदर खतांचे नमुने नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असुन शेतकऱ्यांची फसवणूक करणारे दिपचंद्र एम. श्रीवास रा. नामपुर सटाना नाशिक, विलसन फार्मर फर्टीलाईझर प्रा. लि. – २०१, राधास्वामी सुमीर आनंद लांभवेल रोड, झायडस हॉस्पिटल जवळ, आनंद गुजरात, कंपनी मालक कंपनीच्या जबाबदार व्यक्ती, गोडाऊन मालक मधुकर शंकर भोकरे रा. जारगाव ता. पाचोरा जि. जळगाव यांचा विरुध्द पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये भा.द.वी. कलम ४२०, ४६८ तसेच खत नियंत्रण आदेश १९८५ मधील खंड १९ क ६ खंड ७ व ४ अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ मधील कलम ३ (२) (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक राहूल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.