कजगाव येथे पत्त्यांच्या क्लब वर पोलिसांची धाड; संबंधितांवर गुन्हा दाखल

0

भडगाव प्रतिनिधी

 

तालुक्यातील कजगाव येथे काही दिवसापासून अवैध पत्यांचा क्लब सुरु होता. या बाबत भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पो.हे.कॉ. विलास पाटील, स्वप्निल चव्हान, यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे काल दि.१६ रोजी कजगाव येथील बस स्टँड च्या पाठीमागे अवैध चालू असलेल्या पत्यांच्या क्लबवर धाड टाकली असता यामधे ३६ हजार रु. रोकड जमा करण्यात आली असून ७ जुगारांविरुद्ध जुगार प्रतिबंध अधिनियम 12(a) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. हे. कॉ. छबुलाल नागरे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.