पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सतिश पाटील

0

 

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षपदी डॉ सतिश पाटील तर उपाध्यक्षपदी सुधाकर पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक नुकतिच पार पडली यात महाविकास आघाडीने १८ पैकी १५ जागा मिळवून बहुमत मिळवले होते. त्यानंतर पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान आज ही प्रक्रिया शांततेत पार पडली यामध्ये मा. मंत्री डॉ. सतिश पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने डॉ सतिश पाटील यांना अध्यक्ष म्हणून निवडणूक अधिकारी एम पी कासार यांनी घोषित केले. त्यानंतर उपाध्यक्ष म्हणून सुधाकर पाटील यांची निवड करण्यात आली.

याप्रसंगी महाविकास आघाडीचे डॉ. हर्षल माने, पिरणकुमार अनुष्ठान तसेच सर्व नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते याप्रसंगी अध्यक्षपदी डॉ सतिश पाटील यांची निवड झाल्याबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. दरम्यान यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

Leave A Reply

Your email address will not be published.