झाशीची राणी स्मारकाच्या संवर्धनासाठी रणरागिणीतर्फे मनपाकडे निवेदन…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

२६ मे रोजी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा बलिदान दिन आहे. जळगाव शहरात पुष्पलता बेंडाळे चौकात राणीचे स्मारक उभारण्यात आले आहे. हिंदु जनजागृती समितीप्रणित ‘रणरागिणी’च्या माध्यमातून प्रतिवर्षी बलिदान दिनी स्मारक स्वच्छता आणि पुष्पहार अर्पण करण्यात येतो. सध्या या स्मारकाची अवस्था विदारक झाली असल्याने स्मारकाचे जतन आणि संवर्धन करण्याच्या मागणीचे निवेदन रणरागिणीतर्फे जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांना देण्यात आले. या वेळी रणरागिणी सायली पाटील, धनश्री दहिवदकर, रेखा कुलकर्णी, ऋुतुजा संत आणि सनातन संस्थेच्या क्षिप्रा जुवेकर या उपस्थित होत्या.

बेंडाळे चौकात असणार्‍या राणीच्या स्मारकाचे संवर्धन करणे आवश्यक झाले असून त्यान रंगकाम करणे, फ्लोरिंगचे काम करणे, तेथे दिव्याची (लाईट) व्यवस्था करणे, त्या भागात होणारे अतीक्रमण दूर करणे, स्मारकाच्या आवारात कचरा टाकणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आदी मागण्या या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या. महापौर जयश्री महाजन यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत सदर कामे लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.