सुट्टीवर आलेला सैन्य दलातील जवान पाचोरा येथुन बेपत्ता

0

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील सावखेडा येथील रहिवाशी व जैसलमेर (राजस्थान) येथे सैन्य दलात कार्यरत असलेला २३ वर्षीय जवान हे पाचोरा येथील जारगाव चौफुली येथुन अचानक बेपत्ता झाल्याने जवानाच्या पित्याच्या खबरीवरुन पाचोरा पोलिस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, सावखेडा ता. पाचोरा येथील करण समाधान तडवी (वय – २३) जैसलमेर (राजस्थान) येथे सेवेवर आहे. करण तडवी हे सुट्टी घेवुन सावखेडा येथे आला होता. दरम्यान सुट्टी संपली असल्याने १२ नोव्हेंबर रोजी करण तडवी यांना वडिल समाधान शिलेमान तडवी यांनी पाचोरा येथील जारगाव चौफुलीवरुन सुरत जाणाऱ्या लक्झरी बस मध्ये बसविले होते. मात्र १० दिवस उलटून ही करण तडवी हे जवान जैसलमेर येथे पोहचला नसल्याने तसेच त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता मिळुन न आल्याने समाधान तडवी यांच्या खबरीवरुन २४ नोव्हेंबर रोजी पाचोरा पोलिस ठाण्यात करण तडवी हे हरविल्याची नोंद करण्यात आली असून, करण तडवी यांचा शोध पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल सचिन निकम हे घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.