उत्तरकाशी येथे अडकलेले कामगारांची ख्रिसमसपर्यंत सुटका होण्याची शक्यता

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

उत्तराखंडातील उत्तरकाशी जिल्ह्यातील सिलक्यारा बोगदा कोसळल्याने त्यात ४१ कामगार गेल्या १४ दिवसांपासून अडकून पडले आहेत. त्यांच्या बचावासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहे. त्यातच इथं बचाव पथकात काम करणारे आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञ आर्नोल्ड डिक्स यांनी चार दिवसांपूर्वीच या कामगारांना लवकरच बाहेर काढण्यात येईल असं सांगितलं होतं. पण आता ख्रिसमसपर्यंत ते आपल्या घरी परततील असं त्यांनी म्हटलं आहे.

ड्रिलिंगच काम बंद

पत्रकारांशी बोलतांना डिक्स म्हणाले की, ऑगर मशीन यापुढे काम करण्यास सक्षम नसल्यानं साइटपट्टीवर ड्रिलिंग आणि ऑजरिंग ऑपरेशन्स बंद करण्यात आली आहेत. आम्ही इतर अनेक पर्याय शोधत आहोत. या प्रत्येक प्रयत्नावेळी आम्ही अडकलेले सर्वजण सुखरूप घरी कसे येतील याचस विचार करत आहे. सध्या ते सर्वजण सुरक्षित आहे.

हैदराबादहून बोलावली मशिन
दरम्यान, शनिवारी उत्तरकाशी इथं आलेले उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले, बोगद्याच्या अगदी जवळ आल्यावर ऑगर मशीन अडकलं. मशीनची ब्लेड्स ढिगाऱ्यात अडकले होते आणि आता प्लाझ्मा कटरची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.