विद्यापीठात संविधान दिनानिमित्त हर्षल पाटील यांचे व्याख्यान

0

जळगाव ;– कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र प्रशाळेच्यावतीने संविधान दिनानिमित्त शनिवार दि. २५ नोव्हेंबर रोजी प्रा. हर्षल पाटील यांचे व्याख्यान झाले.

यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. उमेश गोगडीया होते. प्रा. हर्षल पाटील यांनी मानवता रूद्दीगंत करण्यासाठी तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय समाजात रूजवण्यासाठी प्रत्येक भारतीयाने संविधानाचे दूत होण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले. डॉ. तुषार रायसिंग यांनी ही यावेळी मनोगत व्यक्त केले. डॉ. उमेश गोगडीया यांनी अध्यक्षीय समारोप केला. सुकन्या जाधव या विद्यार्थिनीने गीत सादर केले. डॉ. विजय घोरपडे यांनी सुत्रसंचालन केले. यावेळी डॉ. मनोज इंगोले, वर्षा पालखे, डॉ. प्रदिप गोफणे, योगेश माळी, मोईन शेख, डॉ. दीपक सोनवणे, डॉ. कविता पाटील, डॉ. अभय मनसरे, डॉ. समाधान कुंभार, डॉ. समाधान बनसोडे, प्रा. विनेश पावरा, डॉ. डिगंबर सावंत आदीची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.