हतनूर धरणातून रब्बीसाठी सोडले ४५० क्युसेसचे पहिले आवर्तन

0

भुसावळ ;- हतनूर धरणाच्या उजव्या तट कालव्यातून यंदाच्या रब्बी हंगामासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान प्रत्येक महिन्याला दुसऱ्या पंधरवड्यात आवर्तन दिले जाणार आहे. यातील पहिले आवर्तन २४ रोजी ४५० क्युसेस वेगाने हतनूर धरणातून सोडण्यात आले. यामुळे रावेर, यावल व चोपडा तालुक्यातील पाणलोटक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामाला लाभ होणार आहे.

हतनूरमधून शेतकऱ्यांसाठी तीन आवर्तन मिळणार असून परतीचा पाऊस

नसल्याने हतनूर धरणातील जलसाठा यंदा जपून वापरावा लागणार आहे. हतनूर धरणातून रब्बी हंगामासाठी चार आवर्तन सोडावे, अशी मागणी पाणी वापर संस्था व सल्लागार समितीने केली होती. मात्र, प्रशासनाकडून तीन आवर्तन दिले जाणार आहेत. यातील पहिले आवर्तन शुक्रवारी देण्यात आले. तर त्यानंतर फेब्रुवारी अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पुढील दोन आवर्तने दिले जाणार आहेत. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या पाणी वापर संस्थांनी

केलेल्या मागणीनुसार पहिले आवर्तन शुक्रवारी सोडण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या पुढील काळातही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दोन आवर्तन दिले जाणार आहेत. यंदा उशिरापर्यंत आवक नसल्याने रब्बीसाठी दिलेल्या आवर्तनाचे पाणी धरणाच्या साठवणीतून कमी झाल्याची माहिती देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.